नाती हरवत चाललेला समाज "नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही." सुंदर असं अनामिक नातं कुसुमाग्रज यांनी आपल्या या ओळींमध्ये गुंफलेलं दिसून येतं. पण खरोखर नात्याचं काय स्थान आहे सद्यस्थितीतील समाजामध्ये? जर आपण आपल्या भारतीय संस्कृतीत डोकावले तर आजच्या समाजाचे वास्तव नक्कीच भयावह वाटेल. प्राचीन संस्कृतीत, अगदी अश्मयुगापासून टोळी करून राहणारा आदिमानव असो किंवा शेकडो राणी असणारे राजे, आपल्याला एकत्र कुटूंब पद्धती दिसून येतात. अगदी आपल्या आजी-आजोबांच्या पिढीपर्यंत आपल्याला एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रभाव बघता येतो. परंतु आता कुटुंबाचा मूळ चेहरा बदलतोय. एकत्र कुटुंब ते विभक्त कुटुंब आणि नुकतीच उदयास आलेली एकल पालकाची संकल्पना. किती मोठे बदल आहेत हे !! एकेकाळी ४ काका, ४ मावशी-मामा, ४आत्या असायचे. भावंडांसोबत जुळवून घेतानाच आम्हाला नाकीनऊ यायचे. पण त्यानंतर आली ती कुटुंबनियोजनाची शिकवण आणि आत्ताच हे बदलतं कुटुंब. फायद्यासाठी जरी इकडे मेजवानी असली तरी नात्यांमधील विश्वास कमी होऊन हेव्यादाव्यांना यामुळे खतपाणी मिळत आहे. संस्कारांचे महत्त्व कमी झाले आह...