Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

मुलांचा मेंदू आणि पालकत्व

मन नक्की कुठं असतं? हे नेहमीच मला पडलेलं गुपित . परंतु 'मन हे अकरावे इंद्रिय आहे' असा दाखला आपल्याला न्यानेश्वरी मध्येही दिलेला आहे. मन म्हणजे मेंदूचा भावनिक भाग आहे असं आपण म्हणू शकतो, ते हृदयाजवळ असतं असं आपण म्हणू शकतो, किंबहुना ते शरीरातील अणुरेणू मध्ये सामावलेलं असतं असंही मला वाटतं. मानवी मेंदू मार्फत अनेक कार्य साधले जातात. संवेदना ओळखणं, विश्लेषण करणं, शरीराकडून योग्य संदेश घेऊन त्यास प्रतिक्रियारुपी संदेश पोहोचवणं असं ते एक गुंतागुंतीचं जाळ असतं. आणि याच जाळ्यात बाळ जन्मल्या पासून अनुभव त्यांची प्रतिक्रिया यांची जोडणी दडलेली असते. काळानुसार त्यांमध्ये बदल होत असतात परंतु या सर्व जोडण्या बालवयात कार्यरत केल्या नाहीत तर त्यांचा वापर मोठेपणी करता येणे कठीण असतं. जसे बालवयात जर आनंदी अनुभवांमध्ये भर पडली तर मनातील जोडण्या आनंदी अनुभवाशी निगडित असतात. याउलट दुःखात जोडण्यामुळे मोठेपणी सुखाची वृद्धी असूनही त्याचा अनुभव घेण्यास ते मूल असमर्थ ठरतं. दैनंदिन जीवनातील अनुभवातून ते मूल विकसित होत असतं. त्याच्या मेंदूच्या प्रगल्भतेला चालना मिळत असते. थोडक्यात काय तर एखाद्या मुलाला प